मुंबई विद्यापीठ निकालात फेल?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठ आता दुहेरी अडचणीत सापडलं आहे. एकिकडे आज निकालाची डेडलाईन संपली आहे. तर दुसरीकडे बृहत आराखडा सादर करण्याचीही डेडलाईन संपली आहे.   बृहत आराखडा वेळेत सादर न केल्यानं मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांनी बैठकीला परवानगी नाकारली.   मुंबई विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम, तुकड्या […]

मुंबई विद्यापीठ निकालात फेल?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठ आता दुहेरी अडचणीत सापडलं आहे. एकिकडे आज निकालाची डेडलाईन संपली आहे. तर दुसरीकडे बृहत आराखडा सादर करण्याचीही डेडलाईन संपली आहे.

 

बृहत आराखडा वेळेत सादर न केल्यानं मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांनी बैठकीला परवानगी नाकारली.

 

मुंबई विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम, तुकड्या आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठी बृहत आराखडा सरकारकडे सादर करणं गरजेचं असतं. यासाठी सरकारनं विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत बृहत आराखडा सादर करण्याची डेडलाईन दिली होती.

 

मात्र, निकाल जाहीर करण्याच्या 31 जुलैच्या डेडलाईनच्या गोंधळात विद्यापीठाला बृहत आराखड्याचा विसर पडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number