जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे आणखी 39 निकाल जाहीर करण्यात आले. मुंबई विद्यापीठातील 1 हजार 719 शिक्षकांनी बुधवारी 26 हजार 169 पेपर
तपासले आहेत. अजून 2 लाख 70 हजार 834 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरु असतानाच आतापर्यंत 222 विषयांचे निकाल लागले आहेत. यामध्ये कला शाखेचे 102, तंत्रज्ञान शाखेचे 80, विज्ञान शाखेचे
17, व्यवस्थापनचे 17 आणि वाणिज्य शाखेच्या 6 निकालांचा समावेश आहे.
मात्र, अजूनही 255 विषयांचे निकाल लागणं शिल्लक आहे. त्यामुळे 31 जुलैची डेडलाईन हुकल्यानंतर मुंबई विद्यापीठ 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन पाळण्याबाबतही शंका
आहे.