जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठासमोर युवक काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी आंदोलन केले होते. हे आंदोलन हिंसक झाल्यावर तेथील पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तसेच बाराशे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
या विरोधात आज मुंबई युवक आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथे आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
तसेच योगी आदित्यनाथ आणि प्रकाश जावडेकर यांचा पुतळा जाळला. यावेळी या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांची आपसात झटापट झाली.