वृत्तसंस्था, मुंबई मुंबई विद्यापीठाने परिक्षांसदर्भात आणखी एक नवीन नियम बनवलाय. आगामी परिक्षांपासून विद्यार्थ्यांचे परिक्षा क्रमांक, इतर आवश्यक माहिती आणि त्यांचे छायाचित्र असलेले स्टिकर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर लावण्यासाठी देण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी ही माहिती दिलीय. त्याचबरोबर उत्तरपत्रिकांचे मुखपृष्ठही बदलण्यात येणार असून आगामी परीक्षांपासून या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना […]
मुंबई विद्यापीठाने परिक्षांसदर्भात आणखी एक नवीन नियम बनवलाय. आगामी परिक्षांपासून विद्यार्थ्यांचे परिक्षा क्रमांक, इतर आवश्यक माहिती आणि त्यांचे छायाचित्र असलेले स्टिकर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर लावण्यासाठी देण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी ही माहिती दिलीय. त्याचबरोबर उत्तरपत्रिकांचे मुखपृष्ठही बदलण्यात येणार असून आगामी परीक्षांपासून या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.