मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एक महीना पुढे ढकलल्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई विद्यापीठाने तब्बल 30 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे.  विद्यापीठाकडून या परीक्षांचे नवे वेळापत्रक  जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने साहजिकच निकालही लांबणीवर पडणार आहेत. या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत, तर काही परीक्षांचे निकाल […]

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एक महीना पुढे ढकलल्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विद्यापीठाने तब्बल 30 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे.  विद्यापीठाकडून या परीक्षांचे नवे वेळापत्रक  जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने साहजिकच निकालही लांबणीवर पडणार आहेत.

या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत, तर काही परीक्षांचे निकाल पुढील आठवड्यात लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा, नव्या परीक्षांसाठी तयारीची संधी मिळावी, यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.

या परीक्षांचे नवे वेळापत्रक अशाप्रकारे आहे : 

तीन दिवसांवर आलेल्या बी. कॉम. ची परीक्षा मे महिन्यात होईल. १० एप्रिल रोजी होणारा बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट सेमिस्टर ५, फायनान्शियल मार्केट्स सेमिस्टर ५, अकाउंटिंग अँड फायनान्स)चा पेपर आता २ मे रोजी घेतला जाईल, तसेच १६ एप्रिलपासून सुरू होणारी एमएससीची परीक्षा २ जूनपासून सुरू होणार आहे. १८ एप्रिल रोजी होणारी एमएची परीक्षा २१ मे रोजी होईल. १० एप्रिल रोजी होणारी एमएडची परीक्षा १५ मे रोजी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number