जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठ आता हातघाईवर आले आहे.
त्यामुळे परीक्षा विभागाने चक्क चार दिवस कॉलेजे बंद करून प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी जुंपण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सोमवारपासून पुढील चार दिवस कॉलेजांतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. त्या स्वरूपाचे पत्रक सर्व कॉलेजांना पाठविण्यात आले असून तशा सूचना
विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हस्तक्षेप करून 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याची तंबी विद्यापीठाला दिली होती.
त्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करूनही सुमारे सहा लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अद्याप बाकी असून त्यासाठी विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाची मदत घेण्याचे
ठरविले.
तरीही 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची चिन्हे नसल्याने आता विद्यापीठाने कॉलेज़ला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.