जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मंगळवार सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबईला अस्ताव्यस्त करून टाकले होते. रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडली होती. मात्र पावसाने रात्रभर काहीशी विश्रांती घेतली असून मुंबईत
पाऊस ओसरला आहे. जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने सुरू झाली आहे, मात्र ती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. सीएसएमटीहून कल्याणला जाणारी पहिली
लोकल सकाळी 7.30 च्या दरम्यान रवाना झाली आणि रात्रभर अडकलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला.
शीव स्थानकावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा पुन्हा सुरु झाली तसेच पश्चिम रेल्वेवरील वाहतूक देखील संथगतीने सुरु आहे. मुंबई हार्बर रेलेवेची वाहतूक देखील सुरू
झाली असून पनवेलवरून सीएसएमटीसाठी लोकल रवाना झाली होती.