प्रसिध्द डॉ.दीपक अमरापूरकरांच्या मृत्यूनंतरही मुंबईकरांवर मॅनहोलचे संकट कायम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेने मुंबईतील सुमारे एक लाख मॅनहोलमध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र, २९ ऑगस्टच्या या दुर्घटनेला तीन महिने उलटूनही मुंबईकरांवर मॅनहोलचे संकट कायम आहे. मंगळवारी मुलुंडमध्ये नीलिमा पुराणिक या उघड्या मॅनहोलमध्ये पडून गंभीर […]

प्रसिध्द डॉ.दीपक अमरापूरकरांच्या मृत्यूनंतरही मुंबईकरांवर मॅनहोलचे संकट कायम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेने मुंबईतील सुमारे एक लाख मॅनहोलमध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र, २९ ऑगस्टच्या या दुर्घटनेला तीन महिने उलटूनही मुंबईकरांवर मॅनहोलचे संकट कायम आहे.

मंगळवारी मुलुंडमध्ये नीलिमा पुराणिक या उघड्या मॅनहोलमध्ये पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर घटनेचा तपास घेत असता, मॅनहोलमध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याबाबत निविदा प्रक्रियाही सुरू झाली नसल्याचे उघड झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number