जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांच्या देहावरील सोन्याचे दागिने चोरल्याचा चीड आणणारा प्रकार घडला.
शुक्रवारी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने काही नालायकांनी काढून घेतले.
नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये एक तरुण महिलेचे हातातील बांगड्या काढून घेताना दिसून आला.