मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गांसाठी कळवा येथे काम सुरू होणार आहे.
या विशेष ब्लॉकमुळे आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.
कोणत्य़ा फेऱ्या पुर्णत: आणि कोणत्य़ा अंशत: रद्द होणार आहेत
रद्द होणाऱ्या फेऱ्या
- सकाळी 5.57ची डोंबिवली-सीएसएमटी लोकल 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत रद्द
- सायं. 5.15ची ठाणे-दादर लोकल 27 सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत रद्द
- सायं. 5.58ची ठाणे-डोंबिवली लोकल 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत रद्द
- रात्री 11.12ची सीएसएमटी-ठाणे लोकल 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत रद्द
अंशत: रद्द होणाऱ्या फेऱ्या
- सकाळी 7.29ची डोंबिवली लोकल 28 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत ठाण्याहून सकाळी 7.52 वाजता सुटेल
- सायं. 5.53ची सीएसएमटी लोकल 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावेल
- सायं. 6.22ची सीएसएमटी लोकल 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावेल