जय महाराष्ट्र, मुंबई
आज 8 मार्च, जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर, माटुंगा रोड रेल्वे स्थानकात महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात आले आहे. अगदी सुरक्षा रक्षकांपासून ते स्टेशन मास्तर पर्यंतचे सर्व कामकाज महिला सांभळणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्तवाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पश्चिम रेल्वेने महिला विशेष स्थानकासाठी माटुंगा रोड स्थानकाची निवड केली आहे. या स्थानकात दोन फलाट आहे. तिकीट तपासणीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्ती पूर्ण झाली आहे. या महिला अधिकारी आणि कर्मचारी आजपासून माटुंगा स्थानकाचा ताबा घेणार आहेत.
आजपासून माटुंगा रोड हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून कार्यान्वित होईल. या स्थानकात 1 स्थानक व्यवस्थापक, 3 तिकीट तपासणीस, 5 ते 6 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे 12 ते 13 कर्मचारी आणि 2 ते 3 स्वच्छता कर्मचारी असे एकूण 25 कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांकडून माटुंगा रोड स्थानकाची देखभाल केली जाते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी सांगितले. माटुंगा रोड स्थानकाच्या सुरक्षततेसाठी स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकिट खिडकीसह एटीव्हीएम मशिनची व्यवस्था स्थानकात आहे.