येत्या 48 तासात मुंबईत धो-धो; हवामान विभागाचा इशारा

जय महाराष्ट्र, मुंबई   गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून पहाटे कोसऴणाऱ्या मुसळधारा शनिवार, रविवारीही कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. शनिवार, रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. मुंबईत कमाल 32 अंश, किमान […]

येत्या 48 तासात मुंबईत धो-धो; हवामान विभागाचा इशारा

जय महाराष्ट्र, मुंबई

 

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून पहाटे कोसऴणाऱ्या मुसळधारा शनिवार, रविवारीही कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

गेले दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. शनिवार, रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. मुंबईत कमाल 32 अंश, किमान 24 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, तापमानात कमाल 3 अंश तर, किमान 4 अंशाची घसरणी झाली आहे. तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना किंचीत दिलासा मिळणार आहे.

राज्यातही मुसळधार

मुंबईसह राज्यातही दमदार पाऊसाची शक्यता आहे. 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number