जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आता मालाड आणि गोरेगावहून सुटणाऱ्या जलद लोकल थांबणार नाहीत. जोगेश्वरी स्थानकावर यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. बोरिवलीहून सुटणाऱ्या जलद लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात जोगेश्वरीत गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढली आहे.
त्यामुळे मालाड आणि गोरेगावहून सुटणाऱ्या लोकलवरच जोगेश्वरीतील रेल्वे प्रवाशांची भिस्त असते. मात्र, रेल्वेनं त्यांचा हा पर्यायही बंद केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयाला संतप्त प्रवाशांनी रेल रोको इशाऱ्याची हाक दिली आहे.