Mumbai Local Trains: रेल्वेचा प्रवास अन् गर्दीचं टेन्शन? आता चिंता सोडा; मुंबईकरांच्या सेवेत येणार शेकडो नव्या गाड्या

नव्या टर्मिनस, अतिरिक्त मार्गिका आणि आधुनिक सिग्नल यंत्रणेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि गर्दीमुक्त होणार आहे.

Mumbai Local Trains: रेल्वेचा प्रवास अन् गर्दीचं टेन्शन? आता चिंता सोडा; मुंबईकरांच्या सेवेत येणार शेकडो नव्या गाड्या

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे प्रवासाला आता एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि वेगवान व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. या भव्य नियोजनानुसार, येत्या 2030 पर्यंत मुंबईच्या रुळांवर तब्बल 749 नवीन लोकल फेऱ्या आणि 133 नव्या मेल-एक्स्प्रेस धावताना दिसतील. यामुळे गर्दीतून होणारी सुटका आणि वेळेची बचत या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मुंबईची पावले पडू लागली आहेत.

केंद्र सरकारने देशातील प्रमुख 48 शहरांमध्ये रेल्वेची वहनक्षमता दुप्पट करण्यासाठी एक विशेष आराखडा तयार केला आहे. मुंबईतही तत्काळ, अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या योजनेचा मुख्य भाग म्हणजे नव्या मेगा टर्मिनसची बांधणी. पनवेल-कळंबोली, लोकमान्य टिळक टर्मिनस-2, कल्याण आणि परळ येथे नवीन टर्मिनस उभारल्यामुळे एकूण 22 नवे फलाट आणि 36 मार्गिका उपलब्ध होतील. या पायाभूत सुविधांमुळे मध्य रेल्वेला भविष्यात अधिक 68 मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन करणे सहज शक्य होणार आहे.

मध्य रेल्वेवर लोकल प्रवाशांसाठी मोठे बदल पाहायला मिळतील. 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटांची लांबी वाढवणे, कल्याण यार्डाचे आधुनिकीकरण आणि कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांचे काम वेगाने सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण होताच मध्य रेल्वेवर 584 नव्या लोकल फेऱ्या सुरू होतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. यामुळे उपनगरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सोयीचा आणि कमी गर्दीचा होणार आहे.

हेही वाचा: Gautam Adani in Baramati: रोहित पवारांनी चालवली गाडी, अजित पवारांनी केलं स्वागत; देशातील पहिल्या एआय कॉलेजचं अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये उद्घाटन

पश्चिम रेल्वेवरही बदलांचे वारे वाहत असून मुंबई सेंट्रल ते डहाणू रोड दरम्यान रेल्वे मार्गांचे जाळे विस्तारले जात आहे. विरार ते डहाणू आणि बोरिवली ते विरार दरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी सात हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे, येत्या वर्षाच्या मध्यापर्यंत जोगेश्वरी येथे तीन फलाटांचे नवे टर्मिनस प्रवाशांच्या सेवेत येईल, तर 2027 पर्यंत वसई रोड येथील दोन फलाटांचे टर्मिनस तयार होईल. या नव्या टर्मिनसमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची कोंडी फुटण्यास मदत होईल.

पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्येही सुधारणा केल्या जात आहेत. येथे नव्या चार मार्गिका वाढवल्या जाणार असून, सध्याच्या मेल-एक्स्प्रेसला दररोज 70 वाढीव डबे जोडण्याचे नियोजन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुळांचे जाळे विस्तारल्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक पूर्णपणे स्वतंत्र होईल. याचा थेट फायदा म्हणजे 165 नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य आहे. 

केवळ गाड्यांची संख्या न वाढवता, स्थानकांवरील प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी 'डेक'ची उभारणी आणि अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी विभागीय स्तरावर आधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर 2030 ची मुंबई रेल्वे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची असेल, जिथे प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सुविधेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा: BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीत धाकधूक; फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, काय होणार निर्णय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number