जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आहे की लुटीचा महामार्ग असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा लुटारूंची टोळी सक्रिय झाली.
मुंबईच्या प्रवाशाला बेदम मारहाण करुन त्याला लुटण्यात आले. वाकड ते देहुरोडदरम्यान ही लुटीची घटना घडली.
मुंबईचे प्रवासी पंकज कदम वाकडहून मुंबईला येत होते. मुंबईकडे येणाऱ्या एका स्कॉर्पिओमध्ये ते बसले. पण याच गाडीत लुटारूंची ही टोळी होती.
देहुरोडदरम्यान लुटारांनी पंकज कदमला पिस्तुलचा धाक दाखवला. रोख रक्कम, लॅपटॉप, तीन ATM कार्ड, मोबाईलसह बॅग घेउन लुटारु फरार झाले.
पण, पंकज कदमला त्यांनी धावत्या गाडीतून फेकून दिलं. त्यात पंकज कदम गंभीर जखमी झालाय. देहुरोड पोलिसांनी मात्र हद्दीचा वाद निर्माण केला.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे की लुटीचा महामार्ग? प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर