JNPA Port: मुंबई बंदराचा 2030 पर्यंत होणार कायापालट, प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राचा ‘मास्टर प्लॅन’ उघड

केंद्र सरकारच्या 'ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रॅम' अंतर्गत, आता मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी डिझेलऐवजी विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या (Electric Tugs) बोटींचा वापर केला जाणार आहे.

JNPA Port: मुंबई बंदराचा 2030 पर्यंत होणार कायापालट, प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राचा ‘मास्टर प्लॅन’ उघड

JNPA Port: जागतिक व्यापाराचे केंद्र असलेल्या मुंबई बंदराने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या 'ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रॅम' अंतर्गत, आता मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी डिझेलऐवजी विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या (Electric Tugs) बोटींचा वापर केला जाणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) ही दोन्ही बंदरे 2030 पर्यंत पूर्णपणे 'हरित' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

प्रमुख तांत्रिक बदल आणि फायदा 

सध्या वापरल्या जाणाऱ्या डिझेल टग बोटींमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. मात्र, नवीन 60 टन क्षमतेच्या दोन विद्युत टग बोटींमुळे एका फेरीत किमान 150 टनांहून अधिक कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. भारतात सध्या 80 ते 100 टन क्षमतेचे डिझेल टग कार्यरत आहेत. मात्र, मुंबई बंदर आणि JNPA ने आता आधुनिक 60 टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक टग बोटी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या बोटी लवकरच कार्यान्वित होतील. तथापी, समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांमधून मार्ग काढत मालवाहू जहाजांना किनाऱ्यापर्यंत आणण्याचे कठीण काम या बॅटरीआधारित बोटी अत्यंत कार्यक्षमतेने करतील.

हेही वाचा – Petrol Disel Rate Today: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील नवे दर

वाढते प्रदूषण आणि हवामानाचे आव्हान

मुंबईत नुकतेच धुरके आणि खालावलेली दृश्यमानता (Visibility) पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बुधवारी मुंबईचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 118 नोंदवण्यात आला होता. प्रत्यावर्ती चक्रवात स्थितीमुळे उष्ण हवेच्या खाली थंड हवा आणि प्रदूषक अडकून राहिल्याने मुंबईत धुरक्याचे वातावरण होते. अशा परिस्थितीत बंदरावरील डिझेलचा वापर कमी होणे शहरासाठी दिलासादायक ठरेल. 

हेही वाचा – Central Railway Mega Block: जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान मध्य रेल्वेवर 'पॉवर' मेगाब्लॉक; 16 एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम, वाचा सविस्तर

महत्त्वाचे का आहे?

केंद्र सरकारने देशातील पाच मोठ्या बंदरांना 'हरित बंदरे' म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने भाडेतत्त्वावर या बोटी मागवून या मोहिमेत आघाडी घेतली आहे. यामुळे मालवाहतूक केवळ वेगवानच होणार नाही, तर ती पर्यावरणाला पूरकदेखील ठरेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number