जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटणार आहेत.
शिवसेनेकडून भाजपला अल्टिमेटम देण्यात आले आहे. दसऱ्या मेळाव्यात शिवसेना भाजपसह सत्तेत राहायचे की नाही याबाबत मोठी घोषणा करु शकते.
नारायण राणे घटस्थापनेला भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत राणे आपल्या पुढील वाटचालीची घोषणा करणार आहेत.
तर, 21 तारखेलाच कृषीमंत्री सदाभाऊ खोत देखील आपल्या नव्या संघटनेची घोषणा करणार आहेत.