वृत्तसस्था, मुंबई
आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळतय. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून वेळोवेळी ट्रॅफिक अपडेट, बचावात्मक कार्य, जनजागृतीच्या कार्याचे ट्विट्स पाहायला मिळतात.
आजही अशाच प्रकारचे एक ट्विट मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवरून करण्यात आलं. या ट्विटला अनेक ट्विटर युझर्सनी रिट्वीट करत सॅल्यूट केला.
काही कालावधीतच मुंबई पोलिसांच्या या ट्विटला 2 हजारहून अधिक रिट्विट आणि 4 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. 2015 मध्ये मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या ट्विटर अकाऊंटचे 40 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.