केवळ 15 ते 18 मिनिटांत पोलीस प्रशासन पीडिताच्या मदतीस हजर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शहरातील वाढते गुन्हे पाहता पोलीस प्रशासन गंभीर झालेलं दिसतंय. महिलांवरील वाढते गुन्हे यामुळे संपूर्ण राज्याचं वातावरण चिघळतंय. यावर तोडगा म्हणून  पोलीस प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकत पोलीस नियंत्रण कक्षाचं आधुनिकीकरण करण्याचा विचार केला. आधुनिकीकरणासाठी तब्बल 400 कोटी खर्च करून यासाठी एक विशिष्ट योजना निश्चित केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पीडित […]

केवळ 15 ते 18 मिनिटांत पोलीस प्रशासन पीडिताच्या मदतीस हजर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शहरातील वाढते गुन्हे पाहता पोलीस प्रशासन गंभीर झालेलं दिसतंय. महिलांवरील वाढते गुन्हे यामुळे संपूर्ण राज्याचं वातावरण चिघळतंय. यावर तोडगा म्हणून  पोलीस प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकत पोलीस नियंत्रण कक्षाचं आधुनिकीकरण करण्याचा विचार केला. आधुनिकीकरणासाठी तब्बल 400 कोटी खर्च करून यासाठी एक विशिष्ट योजना निश्चित केली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश पीडित नागरिकांना लवकरात लवकर प्रतिसाद देणं, आप्तकालीन परिस्थित त्वरीत ई-कॉलिंगची सुविधा देणं आणि तसेच, इतर यंत्रणांमध्ये आधुनिकीकरण करणे हा आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर ग्रामीण भागात 8 मिनिटांत आणि शहरी भागात 15 ते 18 मिनिटांत नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचा उद्देश पोलीस प्रशासनानं समोर ठेवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number