मुंबईत पार्किंचा विषय खूप मोठा आहे. दाटीवाटीच्या रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या विचित्रप्रकारे गाड्या पार्क केल्याने वाहतूकीमध्ये मोठा अडथळा निर्माण होणाऱ्या अरुंद गल्ल्यांमध्ये पार्किंग नियंत्रित करण्याच्या तयारीत असून लवकरच याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईतील काळबादेवी आणि झवेरी बाजार परिसरात होलसेल बाजारपेठांमुळे दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती असते. अशा कोणताही आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते.
त्याचप्रमाणे, दक्षिण मुंबईतील चंदनवाडी गिरगाव काळबादेवी गावदेवी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा परिसरात 240 हून अधिक अरुंद गल्ल्या आहेत. त्यामधील सुमारे 35 ते 40 गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की, तिथून एकावेळी केवळ एकच वाहन जाऊ शकतं. या भागांमध्ये देखील कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
या सर्व समस्यांवर आता प्रशासनाने उपाययोजना आखली आहे
– काही गल्ल्यांत सम-विषम तारखेनुसार पार्किंगची परवानगी दिली जाईल.
– काही ठिकाणी पूर्ण नो पार्किंग लागू केलं जाईल. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे.
– पर्यायी पार्किंगची ठोस व्यवस्था नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.