जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत मोकळ्या जागा आणि मैदानांची टंचाई असताना जी शाबूत मैदानं आहेत तीही पार्किंगच्या नावाखाली लाटण्याचा घाट घातला जात आहे.
मुंबईतील पार्किंगच्या प्रश्नावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी शहरातील 22 मैदाने पे अँड पार्कसाठी राखीव करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या प्रस्तावाविषयी स्थानिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पे अँड पार्कसाठी 335 जागा निवडल्या असून त्यापैकी 22 जागा मोकळ्या जागा आणि मैदाने आहेत.