भुजबळ-ठाकरे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. पंकज यांनी मात्रोश्रीवर हजेरी लावल्यानंतर राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंकज यांना छगन भुजबळांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली, त्यानंतर […]

भुजबळ-ठाकरे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. पंकज यांनी मात्रोश्रीवर हजेरी लावल्यानंतर राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंकज यांना छगन भुजबळांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनीच आपला मुलगा पंकज भुजबळ यांना पेढे घेवून मातोश्रीवर धाडल्याची चर्चा आहे. 

उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची सुमारे 15 मिनिट भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. 

भुजबळ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शिवसेनेने सामनातून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.  त्यातच आता पंकज भुजबळ मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक वाढलीय का अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number