सोमवारी (दि.१० जून) अचानक झालेल्या पावसामूळ जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापुर रेल्वे स्थानकाच्या मधोमध जितापुर गावाजवळ रेल्वे रूळाखालूनं वाहणाऱ्या नाल्याचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पाणी निघण्यासाठी पर्यायी खोदकाम कुठल्याही प्रकारचं नव्हतं. परंतु, कालच्या पावसानं मूर्तिजापुरकरांना चांगलचं झोड़पल अन् या नाल्याला देखील पूर आला. काल सायंकाळी सहा वाजता पासून रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू झालं अन् रात्री उशिरा साडेतीन वाजता काम पूर्ण झालं. पहिली गाडी ३ वाजून ४० मिनीटानं सोडण्यात आली. कालच्या प्रकारानंतर नागपुर-मुंबई मुख्य रेल्वे वाहतूक जवळपास ९ तास बंद होती. या दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर अनेक रेल्वे जागेवरच तर जास्तीत जास्त रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आले. यामध्ये प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.