जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘मेट्रो-3’ला हिरवा कंदील देत उच्च न्यायालयानं वृक्षतोडीवरील बंदी उठवली आहे. दक्षिण मुंबईत वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या विनंतीमुळे या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती देत त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिला.
दक्षिण मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून मेट्रो-3 अनिवार्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त करण्यात आलं. दक्षिण मुंबईतील मानवी जीवांपेक्षा झाडं महत्त्वाची आहेच का? याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केलं होतं.
दरम्यान, मेट्रो प्राधिकरणानं या कामात होणारी वृक्षतोड भरून काढण्यासाठी तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण करणार असल्याची ग्वाही हायकोर्टात दिली.