Mumbai Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकलच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांनी ‘हे’ जाणून घ्या

प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकलच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांनी ‘हे’ जाणून घ्या

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसून शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.25 ते रविवारी पहाटे 4.25 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत चर्चगेट ते सांताक्रूझदरम्यान धावणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. मात्र, रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नियोजित नाही.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकात धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकानंतर पुन्हा जलद मार्गावर धावतील.

त्याचप्रमाणे ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकलही मुलुंड स्थानकात धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबून माटुंगा स्थानकानंतर पुन्हा जलद मार्गावर धावतील.

हार्बर मार्गावरील सेवा काही काळ बंद
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहतील. तसेच वांद्रे आणि गोरेगावहून सीएसएमटीकडे येणाऱ्या तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे धावणाऱ्या लोकल गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत.

प्रवाशांसाठी विशेष लोकलची व्यवस्था
हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान सुमारे प्रत्येक 20 मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number