जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसैनिक सुनील शितपला अटक करण्यात आली आहे.
शिवसैनिक सुनिल शितप याच्या नर्सिंग होमच्या कामामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
शिपत याचा मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांसह काढलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
मात्र, सुनील शिताप शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नाही असा खुलासा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर दोषी म्हणून कारवाई व्हायला हवी असे महापौर स्पष्ट केले.
मुंबई शहरात आणखी किती इमारतींमध्ये असे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे अथवा सुरू आहे हे वार्ड अधिकाऱ्यांनी पाहावे आणि कारवाई करावी जेणे करून
पुन्हा अशी घटना होणार नाही असेही महापौर म्हणाले.