जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मोनोरेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. मात्र, या आगीमुळे मोनोरेलच्या दोन डब्यांचं मोठं नुकसान झालंय. वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशन इथे पहाटेच्या सुमारास मोनोरेलच्या मागच्या डब्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने ही मोनोरेल रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळलीय. आगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणलीय. दरम्यान, या आगीत मोनोरेलच्या दोन डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.