मुसळधार पावसामुळे मध्य मुंबईतील दादर, सायन आणि किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गुरुवारी सकाळी जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्त्यांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तसेच पावसाचा परिणाम लोकल सेवांवरही झाला आहे.
किंग सर्कल, दादर टीटी, सायन तसेच इतर सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कार्यालयीन वेळेत रस्त्यांवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.
लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार
मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. या गाड्या उशिराने सुटणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.
? #RESCHEDULED_Alert
Train No. 22119 CSMT-MADGAON JUNCTION TEJAS EXPRESS?@Central_Railway@YatriRailways pic.twitter.com/2FUwOD91HO — DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 1, 2026
? #RESCHEDULED_Alert
Train No. 10103 CSMT-MADGAON JN MANDOVI EXP?@Central_Railway@YatriRailways pic.twitter.com/d3OVp7PimD — DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 1, 2026
प्रशासनाचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि उपनगरांमध्ये आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.