या रविवारी देखील मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे .विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभाल-दुरूस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
सीएसएमटी विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावर सुरू राहणार आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल विद्याविहारपर्यंत धावणार आहेत. तर घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटीपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग
सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या लोकल सेवा रद्द असतील. तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द असतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत पनवेल- कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल.
पश्चिम रेल्वे
सांताक्रूझ गोरेगावदरम्यान जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 सांताक्रूझ गोरेगाव दरम्यानच्या जलद लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. याव्यतिरिक्त, काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील. तसेच बोरिवली आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून केवळ गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील.