गणेभक्तांकरिता लोकलच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

अनंत चतुर्दशीदिनानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 10 दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांमधील गणेशाचे भव्य रूप पाहण्यासाठी मुंबईसह मुंबईबाहेरूनही असंख्य लोक मुंबईत येतात. या मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईतील प्रमुख मार्गांवर भाविकांची अलोट गर्दी उसळते. प्रवाशांची गैरसोय […]

गणेभक्तांकरिता लोकलच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

अनंत चतुर्दशीदिनानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

10 दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांमधील गणेशाचे भव्य रूप पाहण्यासाठी मुंबईसह मुंबईबाहेरूनही असंख्य लोक मुंबईत येतात. या मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईतील प्रमुख मार्गांवर भाविकांची अलोट गर्दी उसळते.

प्रवाशांची गैरसोय टाळता यावी यासाठी तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर गेलेल्या भाविकांना रात्री उशिरा घरी परतता यावे यासाठी अनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या मार्गावर विशेष लोकल सुरु केल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number