जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जत लोकलमध्ये घाटकोपर स्थानकात एका महिलेनं मुलीला जन्म दिला.
गुडीया शेख असं या महिलेचं नाव आहे. नातेवाईकांना भेटण्यासाठी ही महिला कुर्ल्याला गेली होती. मात्र अचानक पोट दुखू लागल्यानं रुग्णालयात जाण्यास निघाल्याने
लोकलमध्येच या महिलेची प्रसूती झाली.
सध्या घाटकोपरच्या 1 रुपी क्लीनिकमध्ये तिच्यावर उपचार सुरु असून आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.