विजयाचा उन्माद भाजपच्या डोक्यात, कम्युनिस्ट नेता लेनिनच्या पुतळ्यावर बुलडोझर

वृत्तसंस्था, मुंबई विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. साहजिकच या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, हे कृत्य […]

विजयाचा उन्माद भाजपच्या डोक्यात, कम्युनिस्ट नेता लेनिनच्या पुतळ्यावर बुलडोझर

वृत्तसंस्था, मुंबई

विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले.

साहजिकच या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, हे कृत्य म्हणजे डाव्यांच्याच दमनशाहीविरुद्ध असणारा लोकांचा रोष असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर बुलडोझरच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच पालिकेकडून या पुतळ्याचे अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत. यावरून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपा आणि डाव्यांमधील लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number