सांस्कृतिक पर्वणीचा लेंगी महोत्सव

वृत्तसंस्था, मुंबई मानवी नात्याची वीण घट्ट करणाऱ्या तसेच, प्रेम आणि आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे होळी. बंजारा समाजात हा सण अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाने होळीचे अस्सलपण, आणि परंपरा टिकवून ठेवली आहे. होळी आणि रंगपंचमी हा सण प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. परंपरागत सणाला आधुनिकतेची जोड देऊन […]

सांस्कृतिक पर्वणीचा लेंगी महोत्सव

वृत्तसंस्था, मुंबई

मानवी नात्याची वीण घट्ट करणाऱ्या तसेच, प्रेम आणि आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे होळी. बंजारा समाजात हा सण अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाने होळीचे अस्सलपण, आणि परंपरा टिकवून ठेवली आहे.

होळी आणि रंगपंचमी हा सण प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. परंपरागत सणाला आधुनिकतेची जोड देऊन त्यावर मुलामा चढवून काहींनी त्याचे विकृतीकरण केले आहे. मात्र, बंजारा समाजाने आपली प्राचीन परंपरा जोपासली असून होळी त्यानंतर लेंगी महोत्सव एक सांकृतिक पर्वणीच असते. आता होळीची चाहूल लागल्याने तांड्या-तांड्यावर डफडीच्या तालावर नृत्याचा फेर सुरु झाला असून सर्व बंजारा बांधव होळीच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकसंकृतीचा हा उत्सव बंजारा समाज होळी अर्थातच धुळवड साजरी करते.लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने प्रत्येक तांड्यावर पहावयास मिळतो. डफडीचा आवाज घुमू लागला की त्याच्या तालावर तांड्यातील लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वच फेर धरून आनंदोत्सव साजरा करतांना निदर्शनास येतात. त्याची होळीच्या गाण्याची परंपराही समृद्ध आहे.

होळी गीताचे वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि पुरुष सारे एकत्र येऊन गीत गातात. विशेषतः महिला गीत गातांना एकरूप होऊन तन्मयतेने नाचू लागतात. होळीच्या या लोक संस्कृतीच्या प्रवाहात रितीरिवाज जिवंत तर आहे. शिवाय सण, उत्सव, व्रत, खेळ, मनोरंजन आणि विनोदाचा मेळ घातला जातो हे याचे विशेष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number