Mumbai Konkan Services : कोकणवासियांसाठी दिलासा! कोकणात 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार रो-रो सेवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई–कोकण प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित रो-रो सेवा 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

Mumbai Konkan Services : कोकणवासियांसाठी दिलासा! कोकणात 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार रो-रो सेवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या 2 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुप्रतिक्षित रो-रो (Roll-On/Roll-Off) सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा मुंबई–कोकण प्रवास जलद आणि सोपा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न होत होते. परवानग्या, पावसाळ्यातील हवामानातील अडचणी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प थांबला होता. अखेर सागरी महामंडळाने हे सर्व अडथळे दूर करून ही सुविधा कार्यान्वित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या मार्गामुळे दक्षिण आशियातील वेगवान जलप्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

सध्या मुंबई ते रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग रस्त्याने पोहचण्यासाठी सुमारे 10 ते 12 तास लागतात. मात्र रो-रो सेवेच्या मदतीने मुंबई ते जयगड (रत्नागिरी) हा प्रवास फक्त तीन तासांत आणि मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) हा प्रवास पाच ते साडेपाच तासांत पूर्ण होणार आहे. ही सेवा मुंबईतील भाऊचा धक्का (Ferry Wharf) या ठिकाणापासून सुरुवात होणार असून एका वेळी तब्बल 650 प्रवाशांची सोय होणार आहे. कार, दुचाकी आणि सायकलीसुद्धा बरोबर नेता येणार आहेत. त्यामुळे प्रवास केवळ जलदच नव्हे, तर अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

हेही वाचा  : Ladki Bahin Yojana New Update : 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना मिळणार शून्य व्याजदराने कर्ज

मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासात होणारा उशीर टाळण्यासाठी ही सेवा निर्णायक ठरणार आहे. चाकरमान्यांसाठी आनंद देणारी ही नवी सुविधा कोकणातील पर्यटन, व्यवसाय – उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चांगले आर्थिक बळ देईल. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारी ही रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कोकणवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number