केईएम रुग्णालय तुंबलं; रुग्णांचे हाल !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केईएम रुग्णालयात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने पाणी साचलं आहे. केईएमच्या तळमजल्यावर गुढघाभर पाणी साचलं आहे. पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. संपूर्ण व्यवस्था कोलमडली असल्याने रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांचेही हाल होत आहेत. केईएम रुग्णालयाच्या बाहेरच्या सगळ्या परिसरात पाणी साचलं आहे आणि हेच पाणी आता रुग्णालयातील तळमजल्याच्या वार्डमध्ये शिरलं आहे.   रुग्णालयातील […]

केईएम रुग्णालय तुंबलं; रुग्णांचे हाल !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केईएम रुग्णालयात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने पाणी साचलं आहे. केईएमच्या तळमजल्यावर गुढघाभर पाणी साचलं आहे. पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. संपूर्ण व्यवस्था कोलमडली असल्याने रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांचेही हाल होत आहेत. केईएम रुग्णालयाच्या बाहेरच्या सगळ्या परिसरात पाणी साचलं आहे आणि हेच पाणी आता रुग्णालयातील तळमजल्याच्या वार्डमध्ये शिरलं आहे.

 

रुग्णालयातील पाणी उपसण्याचं काम सुरु आहे रुग्णलयातील सर्व कर्मचारी पाणी उपसण्याचं काम करत आहेत मात्र केईएमच्या बाहेरही संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने यात अडथळा येत आहे. परिणामी याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतोय. 

 

महापालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावले आहेत पण सकाळपासून चालू असलेल्या या जोरदार सरींमुळे हे पंप काम करत नसून याचा कोणताही परिणाम साचलेल्या पाण्यावर होत नाही आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मुंबईत पाणी साचणार नाही असं आश्वासन दिलं होतं पण आजच्या तुफान पावसाने साचलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा पालिकेचे दावे फोल ठरल्याचं पाहायला मिळते आहे. या सगळ्याचा फटका मात्र सामान्य जनतेला बसतो आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number