मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

अमेरिकेतील इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने जगातील १६ मोठ्या शहरांमधील नागरिकांच्या प्रामाणिकपणाचे सर्वेक्षण केले. यात मुंबईकरांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून या मासिकाने अनोखे सर्वेक्षण केले. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीने जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचा बहुमान पटकावला. तर भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील […]

मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

अमेरिकेतील इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने जगातील १६ मोठ्या शहरांमधील नागरिकांच्या प्रामाणिकपणाचे सर्वेक्षण केले. यात मुंबईकरांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून या मासिकाने अनोखे सर्वेक्षण केले. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीने जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचा बहुमान पटकावला. तर भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरली आहे. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पैशांनी भरलेली १२ पाकिटे ठेवण्यात आली होती. प्रत्येक पाकिटात एका व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, कुटुंबाचे छायाचित्र, कूपन, व्यावसायिक कार्ड, स्थानिक चलनानुसार ५० डॉलर म्हणजेच ३ हजार ६०० रुपये ठेवण्यात आले होते. कोणत्या शहरामधून किती पाकिटे परत आणून देण्यात येतात याची वाट पाहण्यात आली. हलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली ११ पाकिटे परत आणून दिली तर मुंबईतील नागरिकांनी १२ पैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. या स्पर्धेत मुंबईने न्यूयॉर्क, लंडन या शहरांना देखील मागे टाकले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number