जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
29 ऑगस्टनंतर आज पुन्हा पावसानं जोरदार कोसळून नागरिकांना घाबरवले. राज्यभरात पाऊस अक्षरश: धो धो बरसतोय.
पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. तर, पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपून काढले.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्यानं कोल्हापुरात राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडावे लागलेत.
तर, इतर 11 धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत. त्यामुळे पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर, पिंपरी चिंचवडमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसत आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. तर दापोली, खेडमध्येही दमदार पाऊस सुरु आहे.