‘मुंबई हाय’ येथून तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘बॉम्बे हाय’ क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ऑईल अॅण्ड नॅचलर गॅस कॉर्पोरेशन या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीला हा साठा मिळाला आहे. 30 दशलक्ष टन तेल आणि नैसर्गिक वायू यातून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन वर्षात हे नवे साठे विकसीत होतील असे सांगण्यात आले आहे. […]

‘मुंबई हाय’ येथून तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘बॉम्बे हाय’ क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ऑईल अॅण्ड नॅचलर गॅस कॉर्पोरेशन या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीला हा साठा मिळाला आहे. 30 दशलक्ष टन तेल आणि नैसर्गिक वायू यातून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या दोन वर्षात हे नवे साठे विकसीत होतील असे सांगण्यात आले आहे.

धर्मेंद्र मंत्री प्रधान यांनी लोकसभेत सांगितले की,‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खोदलेल्या ‘डब्ल्यूओ-24-3’ या विहिरीने या नव्या साठ्यांचा शोध लागला आहे.

खोदकामाच्या वेळी जी काही माहिती मिळत गेली, त्याआधारे नऊ ठिकाणची चाचणी करुन, खोदकाम केले. यानंतर या सर्व ठिकाणांतून तेल/वायू प्रवाहित झाला.”

तेल आणि नैसर्गिक वायूसाठी ‘मुंबई हाय’ हे भारतातील सर्वात महत्ताचे ठिकाण आहे. देशाच्या एकूण तेल उत्पादनापैकी  44टक्के तेल हे मुंबई हायमधून मिळते.

मुंबई हायचे वार्षिक उत्पादन १६ दशलक्ष टनच्या जवळपास आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number