दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले जात असताना फिट येऊन खाली कोसळल्याने एका 20 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
कुश अविनाश खंदारे असे या गोविंदाचे नाव असून तो धारावीचा राहणारा होता.
कुशला बेशुद्धावस्थेत सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
ही दुर्देवी घटना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. धारावीत बाल गोपाळ मित्र मंडळाने दुपारी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचायला सुरुवात केली होती, त्यानंतर कुश पहिल्या थरावर चढला आणि आकडी आल्याने तो खाली कोसळला.
त्याला बेशुद्धावस्थेत तातडीने उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.