Homeमहाराष्ट्र गणेशोत्सवात खड्डेमुक्त मुंबई गोवा महामार्ग मिळणार?
गणेशोत्सवात खड्डेमुक्त मुंबई-गोवा महामार्ग मिळणार?
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. मात्र, ज्या मार्गावरून या गाड्या जाणाराहेत, त्या मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला. तोही फक्त गाडीत बसून, पालीतल्या शासकीय आश्रमगृहात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर […]
गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. मात्र, ज्या मार्गावरून या गाड्या जाणाराहेत, त्या मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला. तोही फक्त गाडीत बसून, पालीतल्या शासकीय आश्रमगृहात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते ठरलेला दौरा अर्धवट आटोपून माघारी फिरले.