मे महिना सुरु झाला आहे. कोकणात लग्न समारंभासाठी गावी निघालेल्या चाकरमण्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूर येथे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. कोकणात येणाऱ्या मार्गावर जवळपास सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
इंदापुर ते रुद्रवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार रविवार सुट्टी असल्याने महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोकणात निघालेले चाकरमणी आणि पर्यटक वाहतूक कोंडीत आडकले आहेत.
हेही वाचा- Maharashtra Weather Alert: काळजी घ्या! विदर्भात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबईत घामाच्या धारा; हवामान विभागाचा 22 जिल्ह्यांना मोठा इशारा
दरम्यान दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका आता थेट रुग्णांच्या जीवाला बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील संगमेश्वरातील सोनवी चौकात भीषण वाहतूक कोंडी वारंवार गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या कोंडीत शुक्रवारी रात्री ‘108’ रुग्णवाहिका अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली.
कुरधुंडा येथील गंभीर रुग्णाला आणण्यासाठी निघालेली रुग्णवाहिका ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीत अडकली. अर्धवट रस्ता, खड्डे यामुळे नागरिकांचा संताप वाढला असून, ‘हा विकास की मृत्यूचा सापळा?’ असा सवाल आता विचारला जात आहे.