जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत नामांकित कंपनीच्या नावानं बनावट दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचं उघड झाले.
तब्बल 800 किलो बनावट दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आलेत. नामांकित कंपन्यांच्या नावानं दुग्धजन्य पदार्थ तयार करून बाजारात विकली जात असल्याची तक्रार
पोलीस ठाण्यात करण्यात आली.
त्यानंतर घाटकोपरच्या चिरागनगर परिसरातील कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल 3 लाख रुपये किमतीचे 800 किलोचा माल जप्त केला. याप्रकरणी 4
जणांना अटक करण्यात आली.