जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
update :
क्रिस्टल सोसायटीला ओसी अर्थात ताबा प्रमाणपत्रच नसल्याचं उघड झालं आहे.
तसंच या इमारतीला फायर एनओसीही नाही.
तरीही गेल्या पाच वर्षांपासून रहिवासी या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.
17 मजली क्रिस्टल टॉवरमध्ये 52 कुटुंब राहत होती.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आग विझवताना अग्निसमन दलाचा 1 जखमी झाला आहे.
क्रिस्टिल टॉवरच्या 12 व्या मजल्यावर भीषण आग नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इमारतीतील 16 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे.
आग लागल्यानंतर या बिल्डिंगच्या लिफ्ट तातडीनं बंद करण्यात आल्या, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांनी जिन्यांच्या सहाय्यानं 12 व्या मजल्यावरील इतर मजल्यांवरच्या लोकांना तातडीनं बाहेर काढलं.
मात्र अजूनही काही जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंदमाता मार्गावर परळच्या सिग्नलजवळ ही नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे. तसेच ही इमारत मुख्य रस्त्यावर असल्याने इथे वाहतूक कोंडी झाली होती.
परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली.
सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
आगीमध्ये रेस्क्यू केलेल्या 16 नागरिकांना वाचविण्यात यश