Mumbai – Delhi AQI: मुंबईमधील प्रदूषण ‘सेफ झोन’कडे; दिल्ली अजूनही प्रदूषणाच्या विळख्यात

मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारल्याने GRAP 4 निर्बंध हटवले असून AQI अनेक भागांत 100 ते 150 पेक्षा खाली आला आहे. BMC च्या तातडीच्या उपाययोजनांचा प्रभाव दिसला.

Mumbai – Delhi AQI:  मुंबईमधील प्रदूषण ‘सेफ झोन’कडे; दिल्ली अजूनही प्रदूषणाच्या विळख्यात

मुंबई: मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले GRAP-4 (Graded Response Action Plan) निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. कारण, 26 नोव्हेंबरनंतर शहरातील वायू गुणवत्ता झपाट्याने सुधारली असून अनेक भागांमध्ये Air Quality Index (AQI) 100 ते 150 च्या खाली उतरला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे प्रदूषण नियंत्रणात आल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. परंतु, याउलट दिल्लीमध्ये GRAP लागू असूनही स्थिती गंभीरच राहिली आहे. अनेक विभागांत AQI 400 च्याही पुढे गेला आहे.

मुंबईत बुधवारी सकाळी 6 वाजता सरासरी AQI 132 नोंदवला गेला, तर नवी मुंबईचा आकडा 144 होता. कांदिवली वेस्टमध्ये AQI केवळ 102 नोंदवला गेल्याने तिथल्या नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. 30 नोव्हेंबरला AQI 114 आणि 1 डिसेंबरला 127 होता, त्यामुळे काही दिवसांतच झालेली सुधारणा स्पष्ट दिसते. AQI वाढल्याचे दिसताच BMC प्रशासनाने त्वरेने कारवाई सुरू केली. प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 482 बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, तर त्यापैकी 264 प्रकल्पांवर थेट कामबंदीचे आदेश दिले गेले.

हेही वाचा: Local Body Elections in Maharashtra: नाशिक निवडणुक 'लक्ष्मी दर्शनाने' गाजली; पैशांची बेसुमार उधळपट्टी

महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी खासगी तसेच सरकारी प्रकल्पांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आदेश दिला. नियम मोडणाऱ्या कोणत्याही प्रकल्पावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली आहेत. वाऱ्याचा वेगदेखील सुधारण्यामागील एक महत्त्वाचा घटक ठरला. 28 नोव्हेंबरपूर्वी वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 4 किमी होता, त्यामुळे धूळ आणि प्रदूषित कण हवेत रेंगाळत होते. पण गेल्या दोन दिवसांत तो वेग वाढून 10 ते 18 किमी प्रतितास झाला असून प्रदूषण पातळीत नैसर्गिकरीत्या घट झाली. त्याचबरोबर, रस्ते धुलाई, पाण्याची फवारणी आणि बेकरींमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर यांसारख्या उपायांनीही हवा स्वच्छ करण्यात मदत झाली.

BMC ने 94 वार्ड-स्तरीय फ्लाइंग स्क्वॉड (Flying Squads) तयार करून सर्व बांधकाम प्रकल्पांवर गस्त वाढवली आहे. हे पथक रस्ते, मेट्रो कामांच्या जागा आणि खासगी बांधकामांची सतत तपासणी करत असून उल्लंघन दिसताच त्वरित नोटिसा देत आहेत. गेल्या 48 तासांत घेतलेल्या या एकत्रित उपाययोजनांचा हवा गुणवत्तेवर थेट परिणाम दिसून आला आहे.

दुसरीकडे, दिल्लीमध्ये परिस्थिती चिंताजनकच आहे. बुधवारी सकाळी 6 वाजता सरासरी AQI 377 नोंदवला गेला. आनंद विहार, बवाना, चांदनी चौक, जहांगीरपुरी, जेएलएन स्टेडियम आणि नेहरू नगर येथे AQI 400 च्यावर पोहोचल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांत जळजळ आणि आरोग्याशी संबंधित अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीची हवा सुरक्षित स्तरावर कधी येईल याचे निश्चित उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच डॉक्टरांनी पालकांना इशारा दिला आहे, “लहान मुलांचे आरोग्य जपायचे असेल तर काही दिवस तरी दिल्लीपासून दूर राहणे उत्तम.”

हेही वाचा: Imran Khan: इमरान खान जिवंत; बहिणीला भेटल्यानंतर केला मोठा दावा; म्हणाले, 'कोठडी भट्टीसारखी…'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number