Mumbai Crime: नोकरानेच आखला व्यापारी कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन; डुप्लिकेट चावीने केला घात, पण कट फसला, चार अटकेत

आरोपींमध्ये व्यापारी कुटुंबाकडे काम करणारा स्वयंपाकी आणि एका प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे.

Mumbai Crime: नोकरानेच आखला व्यापारी कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन; डुप्लिकेट चावीने केला घात, पण कट फसला, चार अटकेत

मुंबईतील जुहू परिसरात वॉचमनची हत्या करून व्यापारी कुटुंबाच्या घरात दरोडा टाकण्याचा धक्कादायक कट जुहू पोलिसांनी उधळून लावला आहे. विलेपार्ले पश्चिम येथील अभिजीत रेसिडेन्शियल बिल्डिंगमधील वॉचमन मनोज यादव यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये व्यापारी कुटुंबाकडे काम करणारा स्वयंपाकी आणि एका प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जोगेश्वर मल्लिक हा गेल्या 10 वर्षांपासून व्यापाऱ्याच्या घरी काम करत होता. घरात मोठ्या प्रमाणात रोकड, भारतीय आणि विदेशी चलन, हिरे, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या विटा असल्याची माहिती त्याला होती. त्यानंतर त्याने व्यापारी, त्यांची पत्नी आणि मुलीची हत्या करून घर लुटण्याचा कट रचला. हा कट तब्बल अडीच वर्षांपासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. मल्लिकने फ्लॅटची डुप्लिकेट चावी तयार करून विजय गोंजारे या साथीदाराकडे दिली होती.

हेही वाचा –Gokul Milk Price Hike: दूध महागणार! 'गोकुळ'च्या म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ 

1 ऑगस्टच्या रात्री गोंजारे आणि त्याचे तीन साथीदार इमारतीत आले. त्यांनी वॉचमन मनोज यादवसोबत दारू प्यायली आणि त्याच्या दारूमध्ये नशेचा पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. त्यानंतर यादवचा गळा आवळून हत्या करून त्याचे हात बांधण्यात आले आणि मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपींनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने व्यापाऱ्याचा फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र चावीने लॉक न उघडल्याने त्यांचा लुटीचा प्लॅन फसला. आरोपींकडे हातोडेही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, 2 ऑगस्टला दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला यादव यांचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. CCTV फुटेजमध्ये विजय गोंजारे ऑपरेशन ग्लोव्ह्ज खरेदी करताना दिसून आला. CCTV आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शरद येरुडकर, महादेव येरुडकर, अनिकेत बोर्नक आणि मुख्य आरोपी जोगेश्वर मल्लिक यांच्यापर्यंत पोहोचले. कमी वर्दळ असलेल्या इमारतीचा फायदा घेऊन हा कट यशस्वी करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता; मात्र फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच डुप्लिकेट चावीने दगा दिल्याने संपूर्ण कट उधळला गेला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number