Mumbai Crime: भूक लागली म्हणून लेकरू रडू लागलं, हैवान बापाला राग आला आणि…; पवईतील घटनेने सर्वच हादरले, नेमकं काय घडलं?

याप्रकरणी नराधम बापाला अटक केली असून अधिक तपास पोलिस करत आहेत. 

Mumbai Crime: भूक लागली म्हणून लेकरू रडू लागलं, हैवान बापाला राग आला आणि…; पवईतील घटनेने सर्वच हादरले, नेमकं काय घडलं?

मुंबईतील पवईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भूकेने रडणाऱ्या चिमुकल्याला त्याचच जन्मजदात्याने संपवलं आहे. या घटनेने सर्वच सुन्न झाले आहेत. याप्रकरणी नराधम बापाला अटक केली असून अधिक तपास पोलिस करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील गौतमनगरमध्ये गुरुवार  रोजी ही घटना घडली. चार वर्षांच्या मुलाची त्याच्या वडिलांनीच हत्या केल्याचा आरोप असून ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. राजेश सिंह असे आरोपीचे नाव असून याने त्याच्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार,  आरोपीची पत्नी 15 दिवसांपूर्वी दुसऱ्या पुरुषासोबत घर सोडून गेल्याची माहिती समोर आली होती.  त्यानंतर राजेश आणि त्याचा 4 वर्षांचा मुलगा एकत्र राहत होते.  मुलगा जन्मतः अपंग होता, त्याला चालता-बोलता येत नव्हते

 29 मे रोजी संध्याकाळी मुलाला भूक लागल्याने तो रडू लागला. मद्यधुंद अवस्थेतील राजेशला मुलाच्या रडण्याचा राग आला.  संतापाच्या भरात मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मारहाणीदरम्यान चिमुकल्याला दरवाजावर आपटले. गंभीर मारहाणीनंतर मुलाने हालचाल करणे बंद केले. 

 त्यानंतर आरोपीने आपल्या बहिणीला बोलावले. डॉक्टरांकडे नेले असता मुलाला मृत घोषित करण्यात आले.  शवविच्छेदन अहवालात कवटीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. राजेश दारूच्या आहारी गेला असल्याची माहिती समोर आली आहे.  पत्नी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.  पवई पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.  प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number