सध्या महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाशिकमधील TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि महिलांवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतही कॉर्पोरेटमध्ये लैंगिक छळाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
सातरस्ता येथील आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या एका तरूणीसह तिच्यासोबत काम करणाऱ्या अन्य दोन तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ऑफिसमधील तरूणाने ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरूणी एका बांधकाम कंपनीच्या महालक्ष्मी येथील साईटवर कार्यालयात कामाला होती. या साईटवरील काम पूर्ण झाल्याने कार्यालय बंद करण्यात आले.
त्याचप्रमाणे, तिच्यासोबत काही अन्य तरूणी या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कामाला होत्या. दोन दिवसांपूर्वी तिला अशरफ नावाच्या तरूणाचा मेसेज आला. त्यानंतर त्याने तिला फोन केला आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. तो अश्लील बोलत असल्याचे ऐकून तरूणीने त्याचा कॅाल रेकॉर्ड करून ठेवला आणि आपल्याला असे काहीच करायचे नाही असे सांगत फोन करू नकोस, असे बजावले.
त्यावर त्याने धर्मावरून शेरेबाजी करत अश्लील व्हिडीओ पाठवले. सध्या तुमच्या धर्मातील तरुणींना आमच्या धर्मातील तरूण आवडत असल्याचे सांगत त्याने तिला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप करण्यात आला असून BNS 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे.