मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती मारहाण करतो म्हणून पत्नीने पोलिसात तक्रार केली. या गोष्टीचा राग म्हणून पतीने पत्नीला लोकलसमोर ढकलले आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पती मारहाण करतो म्हणून पुष्पा गुप्ता या मुलुंड पोलीस ठाणे येथे पती राजू गुप्ता याच्या विरोधात भाऊ कमलेश गुप्ता यांच्या बरोबर गेल्या होत्या. या बाबत मुलुंड पोलीस ठाण्यात एनसी दाखल झाली होती.पुष्पा यांना त्यांचा भाऊ कमलेश आपल्या गावी घेऊन जात होता, त्यासाठी ते मुलुंड रेल्वे स्टेशन येथे आले होते.
हेही वाचा – Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरलं! सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला, आरोपी फरार
मात्र कमलेश याचे सैन्याचे ओळखपत्र कार्ड राजू गुप्ता याने चोरल्याने ते घेण्यासाठी पुष्पाला मुलुंड रेल्वे स्थानकात थांबवून तो मुलुंड येथील राजू च्या घरी गेला, तिथे गेल्यावर राजू गुप्ता आणि पुत्र आर्यन गुप्ता याला घरीच कोंडून ठेवले आणि राजू गुप्ता याने मुलुंड स्थानकात येत पुष्पा गुप्ता यांना लोकल खाली ढकलून दिले.लोहमार्ग पोलिसांनी 20 तासांत राजू गुप्ता याला गुजरात मधून अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.