जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या चेंबुर येथील अमर महल पुलाच्या दुरुस्तीचं काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. हे काम सुरू असतांना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक क्रेन
वरच्या पुलावरून खाली कोसळली.
सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळी पुलाखालील रस्त्यावर सिग्नल असल्याने तेथील वाहतूक थांबलेली होती म्हणून मोठा धोका टळला.
योग्य वेळी क्रेनच्या ड्रायवरने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. टिळक नगर पोलीसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.