घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. घाटकोपरच्या असल्फा परिसरातील ही घटना असून रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रूग्णालयात नेण्यात आला.
सोशल मीडियाच्या वादातून काँग्रेसच्या मनोज दुबेंची हत्या करण्यात आल्याचं समोर आले.
‘पुढच्या वेळेस काँग्रेस आमदारचं असल्फामधून निवडून येईल’ अशी पोस्ट त्यांनी केली होती. यावर काही बीजेपी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनीच मनोज दुबे यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे.